रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष; कोण आहेत बिन्नी वाचा सविस्तर!

नवी दिल्ली : (Roger Binny is the new president of BCCI) बीसीसीआयने सौरभ गांगुली यांना अध्यक्ष पदावरुन डच्चू दिला. गांगुली यांना आणखी एक टर्म पूर्ण करण्याची इच्छा असताना अचानक पदावरुन पायउतार व्हावे लागले. दरम्यान, त्यानंतर आज नवनिर्वाचित अध्यक्षांची निवड करण्यात आली. राॅजर बिन्नी यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
बिन्नी हे भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू आहेत. अष्टपैलू रॉजर बिन्नीनं 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. बिन्नीनं 27 कसोटी, सामन्यात 830 धावा आणि 47 विकेट्स घेतल्या, तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा आणि 77 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत.
तसंच रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.
तर, राजीव शुक्ला बीसीआयच्या उपाध्यक्षपदी कायम आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतले.