ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उपोषणावर टीका करणाऱ्यांवर आबांचा छावा बरसला; म्हणाले, “…हि वृत्ती आबा अन् त्यांच्या कुटुंबियांची नाही”;

सांगली : (Rohit Patil On Sanjaykaka Patil) सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील 210 गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा (Tembhu Lift Irrigation Project) जन्म झाला. याच टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आमदार सुमन पाटील (Suman Patil) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. मुलगा आणि राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पाटीलही (Rohit Patil) उपोषणासाठी उपस्थित राहणार आहे. पाण्याच्या बाबतीत आम्हाला राजकारण करायचं नाही, असंही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रसिद्धी वाढली म्हणून आमदार सुमन पाटील आणि त्यांचा मुलगा मी रोहित पाटील आम्ही उपोषण करण्याची नौटंकी करतोय, असं बोललं जात आहे. खरं तर हा विषय पाण्याचा आहे, यावर राजकारण करायचा नाही आणि विरोधकांवर अजिबात बोलायचं नाही, हे आम्ही ठरवलं होतं. पण काही लोक वल्गना करत आहेत, असं रोहित पाटील म्हणाले.

माझं म्हणजेच, आमदार सुमन पाटील यांच्या मुलाचं भविष्य अंधारात जाईल असं काही लोक म्हणतायत, मात्र प्रत्येक विषय असेल, प्रत्येक प्रश्नासाठी आरआर आबांच्या कुटुंबानं त्यांच्या पश्चातसुद्धा कसं काम केलंय, हे इथल्या प्रत्येक कुटुंबानं पाहिलंय, असंही रोहीत पाटील म्हणाले आहेत.

त्याचप्रमाणे निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे काम करायचं ही वृत्ती आबांच्या कुटुंबियाची नाही, असं रोहित पाटील म्हणाले. सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या टिकेनंतर रोहित पाटीलांनी थेट सुनावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये