ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“कार्यक्रमातील भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल..”, पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची टीका

मुंबई | Rohit Pawar – काल (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निशाणा साधला आहे. काल मुंबईत झालेला कार्यक्रम हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!”

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. “मात्र, 2016 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!” असं ट्विट करत अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं?”, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये