क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

रोहित-कोहलीची टी-२०मधून निवृत्ती? द. आफ्रिका दौऱ्यापुर्वी BCCI च्या भूमिकेकडे लक्ष

नवी दिल्ली : (Rohit Sharma and Virat Kohli Retirement) विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांची टी २० मालिका खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेच्या संघातील बहुतेक खेळाडूंनी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरवण्यात आला आहे. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा या भारताच्या दोघा स्टार खेळाडूंनी फक्त याच मालिकेतून ब्रेक घेतला नसून ते थेट टी २० क्रिकेटमधूनच निवृती घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

BCCI च्या धोरणाची चर्चा!
बीसीसीआयकडून पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आत्तापासूनच संघ बांधणीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठीच बीसीसीआयकडून या संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच या संघात विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयकडून या दोघांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने क्रिकट्रॅकर संकेतस्थळानं दिलं आहे.

या वृत्तानुसार, बीसीसीआयनं टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं की नाही, यासंदर्भातला निर्णय पूर्णपणे विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांवरच सोपवला आहे. या दोघांनी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला, तरी बीसीसीआयकडून त्यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे आता विराट कोहली व रोहित शर्मा नेमका काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून या दोघांनी बाहेर राहणं पसंत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये