नवी दिल्ली : (Rohit Sharma On T20 Team India) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेच्या पुर्वसंध्येला (IND vs SL ODI) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. आगामी काळात तो T20 संघाचा भाग असेल की नाही याबद्दल त्याने स्वत:च सांगितले.
श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका मंगळवार दि. 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना रोहितने ही माहिती दिली. यावेळी ‘मी अजून टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतलेला नाही’, असं स्पष्टपणे रोहितने सांगितलं. एकदिवसीय मालिकेपूर्वी खेळलेल्या टी-20 मालिकेत रोहित संघाचा भाग नव्हता आणि त्याच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.
रोहित शर्मा टी-20 संघात पुनरागमन करू शकणार नाही, अशा बातम्यांनी जोर धरला होता. याचे उत्तर रोहितने आता दिले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल उत्तर देताना सांगितले की, मी अद्याप टी-20 फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. आता तो आगामी टी-20 मालिकेत भारतीय संघात दिसणार असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. त्याच्या T20 कारकिर्दीव्यतिरिक्त त्याने इतर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.