रूबीना दिलैकनं दिली गुड न्यूज; बेबी बंपचा फोटो शेअर करत केली खास पोस्ट

Rubina Dilaik Pregnant | बिग बॉस फेम अभिनेत्री रूबीना दिलैकनं (Rubina Dilaik) गुड न्यूज (Good News) दिली आहे. रूबीना आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) आई-बाबा होणार आहेत. याबाबातची खास पोस्ट रूबीनानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
रूबीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तसंच ही पोस्ट शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मी आणि अभिनव रिलेशनमध्ये आलो होतो तेव्हाच आम्ही एकमेकांना वचन दिलं होतं की, आपण एकत्र संपूर्ण जग एक्सप्लोर करू. भरपूर दिवस डेटिंग केल्यानंतर आम्ही लग्नबंधनात अडकलो. आता लवकरच कुटुंब म्हणून जग फिरू आणि आमच्या छोट्या ट्रॅव्हलरच्या स्वागताला आम्ही सज्ज आहोत.”
रूबीनानं ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्यावर आणि अभिनववर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. सध्या रूबीना आणि अभिनव अमेरिकेत असून तिनं कॅलिफोर्नियामधून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.