ताज्या बातम्यारणधुमाळी

“महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची…”, संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर रूपाली चाकणकर आक्रमक

मुंबई | Rupali Chakankar On Sambhaji Bhide Controversial Statement – शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका महिला पत्रकारानं कुंकू लावलं नसल्यानं संभाजी भिंडेंनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो”, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील भिडेंवर हल्लाबोल केला आहे.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याची महिला आयोगानं दखल घेतली असून त्यांना नोटीस पाठवली आहे. तसंच रुपाली चाकणकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी भिडेंनी यापूर्वीही ‘आंबे खाल्ल्यानं मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणं चुकीचं आहे”, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

“ही समाजाची विकृती आहे. सातत्यानं महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीनं याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसंच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा”, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये