“लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाही”

परभणी – Rupali Chakanakar on Vat Savitri Pournima | मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत. माझ्या सासरच्या मंडळीनी देखील तसा आग्रह कधी धरला नसल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही, असंही चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दरवर्षी आपण पाहत असतो की वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करत त्याला फेरे मारतात. पूजा करताना त्या प्रार्थना करतात की मला सात जन्मी असाच पती मिळू दे जरी त्यांचा पती त्यांना रोज त्रास देत असेल तरी सुद्धा अशा महिला वडाच्या झाडाला त्यांच्या पती साठी प्रार्थना करतात कारण शेवटी समाज काय म्हणेल म्हणून त्यांना वडाची पूजा करावी लागते, असंही त्यांनी म्हटलं आहे.