रूपाली ठोंबरेंच्या फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो पोस्ट! म्हणाल्या; “मी शेंगा खाल्ल्या नाही…”

पुणे : आपल्या आक्रमक पणाची ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. सकाळी ७ च्या दरम्यान त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचंही म्हटलं जातं आहे. मात्र, त्यावर रूपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या, हा फोटो मी पोस्ट केला आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भाजपच्या गुंडांवर करा.
शुभ सकाळ
कसब्याचा नव्या पर्वाची ,कामाची सुरवात
आपला माणूस ,कामाचा माणूस.

हा फोटो त्यांचाच आहे हे समजून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केली. त्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
या प्रकरणी रुपाली पाटील म्हणाल्या की, मी अजून मतदान केल नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्या व्यक्तीनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावे की मी मतदान केले की नाही. त्यामुळे मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यासह १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहण्यास मिळाल्या.ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.