रशियाचं स्वप्न भंगलं, चंद्रावर लूना 25 चं क्रॅश लँडिंग
Luna-25 Crash | रशियाची (Russia) चंद्रमोहीम अपयशी ठरल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. रशियाचं लूना-25 अंतराळयान चंद्रावर क्रॅश (Luna-25 Crash) झालं आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉसने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रशियाचं लूना-25 अंतराळयान 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं. रशियाने तब्बल 47 वर्षांनंतर चंद्रमोहीम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहीम अयशस्वी ठरली आहे.
रशियाचं लूना-25 अंतराळयान क्रॅश जवळपास पन्नास वर्षांनंतर रशिया चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लूना-24 पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लूना-25 अंतराळात पाठवण्यात आलं. त्याने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता.
11 दिवसांत म्हणजे 21 ऑगस्टला ‘लूना-25’ चंद्रावर उतरणार होतं. हे यान अधिक शक्तिशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहीम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं आहे. रशियाच्या ‘लूना २५’ या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं चांद्रयान ‘लूना २५’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं आहे. रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसने ही गोष्ट मान्य केली आहे. रशियन अंतराळ संशोधन संस्थेनं त्यांच्याकडून माहितीचं विश्लेषण करण्यात चूक झाल्याचं मान्य केलं आहे.