देश - विदेश

खेळाच्या कारकिर्दीपेक्षा, वादांच्या भोवऱ्यात सापडणारा ‘हा’ माजी खेळाडू पुन्हा अडचणीत! FIR दाखल

तिरूअनंतपुरम : (S Sreesanth filed FIR) भारताचा माजी दिग्गज खेळाडू सध्या चांगल्याच संकटात सापडला आहे. त्याच्यावर फसवणूकीच्या आरोपाखाली FIR देखील दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघातील महत्त्वाचा वेगवान गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आपल्या खेळाच्या कारकिर्दीपेक्षा, श्रीसंत हा अनेक वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. केरळ पोलिसांनी एस. श्रीसंत आणि अन्य दोघांविरोधात FIR दाखल केला आहे.

केरळच्या कन्नूर जिल्ह्यामधील एका व्यक्तीने श्रीसंत आणि इतर दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 25 एप्रिल 2019 पासून ते आत्तापर्यंत आरोपी राजीव कुमार आणि वेंकटेश किनी या दोघांनी माझ्याकडून एकूण 18.70 लाख रुपये उकळले. कर्नाटकच्या कोल्लूरमधअये खेळाशी संबंधित एक ॲकॅडमी उघडू आसा दावा आरोपी राजीव आणि वेंकटेश यांनी केला होता. त्यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत हा देखील भागीदार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. श्रीसंतचाही सहभाग असल्याचा आरोप सरीश गोपालन यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीसंतला आरोपी घोषित केलं आहे.

IPL-2013 कथित स्पॉट फिक्सिंगसाठी

क्रिकेटची कारकीर्द सुरू झाल्यापासू एस. श्रीसंत हा बऱ्याच वेळा वादत सापडला आहे. आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंगसाठी एस. श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. सध्या श्रीशांत लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 मध्ये भाग घेत आहे. एस. 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीशांत विजयी भारतीय संघाचा भाग होता. श्रीशांतने भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. या काळात त्याने एकूण 169 विकेट घेतल्या.

श्रीसंतचा आयपीएल रेकॉर्ड

आयपीएलमध्ये एस श्रीशांतने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून पदार्पण केले. यानंतर त्याने कोची टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR) साठी T20 लीगमध्ये भाग घेतला. 44 आयपीएल सामन्यांमध्ये 29.9 च्या सरासरीने श्रीशांतच्या नावावर 40 विकेट आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये