सचिन तेंडुलकर होणार BCCIचा अध्यक्ष? मास्टर ब्लास्टरचं भन्नाट उत्तर; म्हणाला…
मुंबई : (Sachin Tendulkar) भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याच्याकडून भन्नाट उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे एकच हश्या पिकला. त्यामुळे येत्या काळात सचिन तेंडुलकर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, क्रिकेटर बीसीसीआयचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष झाले आहेत, सचिनही या पदावर कधी येईल का? यावर सचिननं गमतीशीर आणि क्रिकेटच्या भाषेत उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, मी वेगवान गोलंदाजी करत नाही. म्हणजेच एकप्रकारे त्याने या विषयावर बोलणं टाळलं आहे.
शुक्रवार दि. 17 मार्च रोजी सचिन तेंडुलकर इंडिया टुडे काॅन्क्लेव्ह 2023 या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी बोलताना सचिननं बाॅर्डर-गावस्कर ट्राफी, एकदिवसीय विश्वचषक यापासून एकदिवशीय क्रिकेटच्या भवितव्याबाबद भाष्य केलं आहे.
यावेळी सचिनला काही प्रश्न विचारण्यात आले होते, सचिन अजूनही शॅडो बॅटिंग करतोका? तो अजूनही नेटवर जातो का? याचे उत्तर देताना तो म्हणाला, असे दररोज होत नाही, मध्ये काही स्पर्धा खेळल्या गेल्या आणि नंतर सराव झाला. पण माझा असा विश्वास आहे की, जेव्हा तुमच्या हातात बॅट असते तेव्हा मी फक्त मनोरंजनासाठी नसावी. या अशा फिरवाफीरवीच्या उत्तराने अनेकजन गोंधळून गेल्याचे दिसून आले आहेत. सचिन तेंडुलकरने कोणत्याचं प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही.