‘या’ अभिनेत्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक, क्रांती रेडकरनं उघड केलं गुपीत

मुंबई | Sai Tamhankar – प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे जगभरात लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील सईनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये सईनं एक फोटो शेअर केला असून या फोटोत ती एका प्रसिद्ध अभिनेत्याशी बोलत आहे. ज्याच्याशी बोलताना सईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. यासंदर्भात आता अभिनेत्री क्रांती रेडकरनं खुलासा केला आहे.
सईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सई एका अभिनेत्याशी बोलताना दिसत आहे. मात्र या अभिनेत्याचा चेहरा या फोटोत दिसत नाहीये. तसंच सईनं हा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की, “रिअलवाला कॅन्डीड, ओळखा पाहू कोण?”, सईच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये क्रांती रेडकरच्या कमेंटनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. क्रांतीनं लिहिलं आहे की, “मी लगेच ओळखलं तू कोणाशी बोलतेस, आपण याविषयी खूप आधी बोललो होतो, तुझ्या डोळ्यातील चमकच सांगतेय तु त्याच्याशीच बोलतेस.”
दरम्यान, सईनं शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. पण, क्रांंतीची ही कमेंट सर्वात अधिक लक्षवेधी ठरत आहे. खरं सांगायचं झालं तर सई त्या फोटोत प्रतिक बब्बरशी (Prateik Babbar) बोलत आहे. जो स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. तसंच तो एक बॉलीवूडचा उत्तम अभिनेता आहे.