करिनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफ ‘या’ मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये होता

मुंबई | बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या वादांपासून दूर राहिला असेल तरी करीना कपूरशी (Kareena Kapoor) लग्न करण्यापूर्वी तो नेहमीच आपल्या खासगी नात्याबाबत वादात सापडला आहे. सैफ अली खानने दोन लग्न केले. एक अमृता सिंगसोबत (Amrita Singh) आणि दुसरी करीना कपूरसोबत, पण करीनाशी लग्न करण्यापूर्वी त्याचं एका परदेशी मॉडेलसोबत अफेअर असल्याचही म्हटलं जातं.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. अमृता सिंग सैफ पेक्षा तब्बल 13 वर्षांनी मोठी होती. या दोघांच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. या दोघांचं नातं प्रेमाने जुळलेलं होतं. परंतु काही कारणांमुळे दोघांच्या नात्यात दरी पडली असं म्हटलं जातं. या दोघांच्या नात्यात दुरावा का आला याचा खुलासा खुद्द सैफ अली खानने केला होता.
हळूहळू या गोष्टी त्यांच्या नात्यात विषासारख्या मिसळल्या. मुलगा इब्राहिमच्या जन्मानंतर सैफचे नाव परदेशी मॉडेल रोजासोबत (Rosa Catalano) जोडले गेले होते. आणि नंतर जेव्हा हे अमृताच्या कानावर पोहोचले तेव्हा तिला ते सहन झाले नाही. त्यानंतर त्यांचे नाते सुधारण्याऐवजी बिघडतच गेले. सैफने 1991 मध्ये अमृता सिंहसोबत लग्न केले आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले.
करीना कपूरच्या आधी सैफची एक विदेशी गर्लफ्रेंड होती हे फार कमी लोकांना माहीत असेल. मिळालेल्या माहितीनुसार सैफ रोझाला केनियामध्ये एका शोदरम्यान भेटला होता. यानंतर रोजाही कामाच्या शोधात भारतात आली. याआधी रोजाला सैफच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अजिबात माहिती नव्हती. रोजाला जेव्हा सैफच्या वैवाहिक आयुष्याबद्दल कळले तेव्हा तिला धक्काच बसला. एका भारतीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासाही केला होता. तो म्हणाला- ‘सैफने तिच्यासोबत अनेक भेटीनंतरही लग्नाबद्दल काहीही सांगितले नव्हते. हे जाणून मला खूप आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे, रोजा कॅटालानो ही स्विस मॉडेल असून तिचा जन्म इटलीमध्ये झाला आहे.