मुंबई | Samantha – प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या चांगलीत चर्चेत आली आहे. कारण तिनं तिचा पूर्व पती नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) पॅचअप केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. समंथा ऑक्टोबर 2021 मध्ये नागा चैतन्यपासून विभक्त झाली होती. तर घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक होती, असं समंथानं काही मुलाखतींमध्ये सांगितलं होत. तर आता दोन वर्षांनंतर समंथा आणि नागा चैतन्य एकत्र आल्याच्या चर्चा सुरू आहेत.
त्याचं झालं असं की, समंथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो अनआकाईव्ह (unarchive) केले होते. तर घटस्फोट घेतल्यानंतर समंथानं नागा चैतन्यसोबतचे फोटो डिलिट केल्याचं म्हटलं जात होतं. पण समंथानं ते फोटो डिलिट न करता इन्स्टाग्रामवर आर्काइव्ह केले होते. मात्र, आता ते फोटो पुन्हा तिच्या अकाऊंटवर दिसू लागले आहेत.
जर आपल्याला इन्स्टाग्रावर काही फोटो काढून टाकायचे असतील तर ते फोटो आपण आर्काइव्ह करू शकतो. तसंच नंतर तेच फोटो अनआर्काइव्ह करून तेच फोटो पुन्हा आपल्या अकाऊंटवर दाखवू शकतो. तर समंथानं घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्यसोबतचे फोटो आर्काइव्ह केले होते. पण आता तिनं नागा चैतन्यसोबतचे फोटो अनआर्काइव्ह केलेत त्यामुळे तिनं नागासोबत पॅचअप केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.