‘या’ कारणामुळं संभाजी ब्रिगेडकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जाहीर निषेध!

मुंबई : (Sambhaji Briged On CM Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदावर येणारे हे बंडखोर असतील, व्यभिचारी असतील, राजकीयदृष्ट्या त्यांनी गद्दारी केलेली असेल, प्रतारणा करणारे लोक आपले पाप धुण्यासाठी जर विधिवत पूजा करणार असतील, तर हा त्या धर्माचा सुद्धा अनादर आहे शिंदे यांनी भारतीय राज्यघटनेचा तर अवमान केलेलाच आहे, पण राज्य सरकारनं यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाचाही अवमान केला आहे,असं निषेध करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात पूजा केली. या कृतीचा संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दात निषेध केला आहे. राज्य सरकार हे धर्मनिरपेक्ष आहे. खरेतर ज्यांची नियत साफ नाही, ज्यांची नितिमत्ता साफ नाही, ज्यांना भिती वाटते, असे लोक पूजाअर्चा करतात. तर त्यांनी पाप केलेले असते ते लोक या मार्गाचा अवलंब करतात. तुम्ही मोठ्या मनाने, साफ मनाने तुम्ही राज्यकारभार करा.
पुढे ते म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या अडीअडचणींमध्ये मदत करा. ज्या फाईली रखडलेल्या आहेत, ती कामे करा. हा भारतीय राज्यघटनेचा तर अवमान आहेच, पण सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा देखील अवमान आहे. तुम्ही धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचा अवमान करणार नाही, त्याच प्रमाणे माझ्याही धर्माचे स्तोम माजवणार नाही, उन्माद करणार नाही, अशी शपथ घेऊन तुम्ही सत्तेवर आला आहात.