संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड काय घडलं?; संजय राऊतांनी उघड केली अंदर की बात!

मुंबई : (Sanjay Raut On Shambhajiraje Chatrapati) स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात राज्यसभेच्या जागेवरुन काय चर्चा झाली याची माहिती खुद्द संभाजीराजेंनी उघड केली आहे. त्यानंतर शिवसेना (Shivsena News) नेते संजय राऊत (Sanjay Raut यांनी आधी थेट मुख्यमंत्र्यांच्या विश्वासहार्यतेवर अविश्वास दाखवता येणार नसल्याचं सांगितलं. राज्यसभेची जागा ही फक्त आणि शिवसेनेची होती. त्यामुळं त्यावर शिवसेनेचाच दावा आहे. त्यावर इतर कुणीही दावा करु शकत नाही. शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आणि राज्यसभेत शिवसेनेचं बळ एका संख्येने वाढवायचं हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे आम्ही संभाजीराजेंना घातलेली अट योग्यच होती, असं राऊत म्हणाले. “तुम्हाला शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायचा की नाही, याचा निर्णय माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेईल”, एवढंच मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं. त्या उपर दुसरं काही घडलं नाही. असं राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान काल संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला सांगितला. मी या प्रस्तावाला तिथेच नकार दिला. महाविकास पुरस्कृत उमेदवार करण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला. त्यावर मुख्यमंत्री आपल्याला शिवसेना पुरस्कृत उमेदवार तयार करायला होते. आपणही या प्रस्तावाला तयार होतो, असं सांगतानाच तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून हे सांगायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनीही सांगाव, असं आव्हानच संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यामुळं संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल बंद दाराआड झालेल्या चर्चेला उधान आले होतं. त्यावर आज शिलसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बंद दाराआड नेमकं काय घडलं हेच संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं बंद दाराआड नेमकं काय झालं? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
सध्या शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. संभाजीराजेंना शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्यानंतर राऊत यांचा हा दौरा असल्याने त्याकडे संपुर्ण राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. संभाजी छत्रपतींच्या जिल्ह्यात येऊन राऊत काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता लागली होती. राऊत यांनीही आज आपले दिवसभराचे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे राऊत मोठा खुलासा करणार याची सर्वांनाच कुणकुण लागली होती. पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर राऊत यांना संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बंद दाराआडील चर्चेबाबत प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनीही मोजक्याच शब्दात पण बंद दाराआड नेमकं काय झालं याची माहिती दिली.