महाराष्ट्ररणधुमाळी

संभाजीराजे छत्रपती राजकारणात आले तर, पश्चिम महाराष्ट्रात नुकसान राष्ट्रवादीला आहे, भाजपला नाही ; फडणवीस

नागपूर : (Devendra Fadnavis On NCP) स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांना शिवसेनेनं (Shivsena) राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये (BJP) या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र, थेट राष्ट्रवादीलाच या प्रकरणात ओढलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात संभाजीराजेंमुळे कुणाला नुकसान होणार हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच (NCP) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मीडियाशी बोलताना पुढे म्हणाले, श्रीमंत शाहू महाराज (Shrimant Shahu Maharaj) यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असावी. संभाजीराजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात त्यांच्या सामाजिक कार्यामुळं चांगल्या प्रकारे होत आहे. मराठा आणि बहुजन समाजात त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. त्यांनी जर राजकिय वेगळं नेतृत्व तयार केलं तर पश्चिम भाजपला त्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. याचं सर्वात मोठं नुकसान कोणाला होणार आहे, हे सर्वांनाच माहित आहे. असा नाव न घेता अप्रत्यक्ष राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली. तर दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काही अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक राजकारणासाठी अशा प्रकारचे वातावरण तयार करत आहेत ते नक्की उघडे पडतील, असं फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये