ताज्या बातम्यारणधुमाळी

फडणवीसांकडून त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Sambhaji Raje Chhatrapati – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. मात्र, काल (20 नोव्हेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोघांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहेत? हे मला कळलं नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी त्यांचं समर्थन करण्यापेक्षा ते माफी कशी मागतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे.”

दरम्यान, वीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंदर्भातला एक व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “सुधांशू त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही”, असं फडणवीस म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये