कोल्हापूर : समाजात कामे करायची असतील तर सत्ता असायला लागते. मी आत्तापर्यंत समाजहितासाठी लढलो. आणि गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामुळे मला अजून कामे करता आली. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. असं छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर ते अपक्ष म्हणून लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आहे. आम्ही सर्व एक संघटना स्थापित करणार आहोत. त्याचं नाव ‘स्वराज्य’ आहे, असंही संभाजी राजेंनी सांगितलं. भविष्यात ही संघटना राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. हा पहिला टप्पा आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचे संकेत दिले.