अखेर १५ ऑगस्टला समृद्धी महामार्ग सुरू होणार

मुंबई : समृद्धी महामार्ग हा ७१० किलोमीटरचा आहे. समृद्धी महामार्ग हा १२० मीटर रुंदीचा, तसेच सहापदरी असा असणारा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यांमधून जात आहे, तसेच सत्तावीस तालुक्यांमधूनदेखील समृद्धी महामार्ग जात आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जाते आहे. मात्र हा महामार्ग कधी सुरू होणार, हा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग १५ ऑगस्टला सुरू होणार, असे त्यांनी सांगितले आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचे उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आले होते. समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट रोजी नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग चालू करणार असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते की, समृद्धी महामार्ग गेम चेंजर आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. या महामार्गामुळे लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असेही शिंदे यांनी म्हटले होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारकडून ऑक्टोबर २०२१, ३१ डिसेंबर २०२१ आणि आता ३१ मार्च २०२२ ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. या आधी महामार्ग सुरु करण्याबाबत सारख्या तारखा जाहीर केल्या जात होत्या. नागपूर -मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.