ताज्या बातम्यामनोरंजन

धर्मासाठी सिनेविश्वाचा त्याग करणारी ‘ही’ अभिनेत्री वयाच्या 34व्या वर्षी होणार आई

मुंबई | अभिनेत्री सना खानने (Sana Khan) बॉलिवूडला कायमचाच रामराम केला असल्याची घोषणा केली. तिच्या या निर्णयानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 2020 साली अभिनेत्रीने मुफ्ती अनस सैयदशी (Mufti Anas) लग्न करत ग्लॅमरच्या जगाला अलविदा म्हटलेले. अभिनेत्रीने धर्माचा मार्ग स्वीकारत पुन्हा अभिनय क्षेत्रात काम न करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला होता. अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे ती कायमच चाहत्यांशी संवाद साधत असते. दरम्यान आता सनाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याची बातमी तिने दिली.

सना खान आणि तिचे पती अनस सैयद यांनी इक्रा टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत या गुड न्यूजच्या वृत्ताला दुजोरा दिला. दोघेही लवकरच पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सना म्हणाली की ती खूप उत्साहित आहे. लवकरच तिचे बाळ तिच्या कुशीत यावे अशी इच्छा सनाने व्यक्त केली.

सना आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. सिनेविश्वात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सनाच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेली असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सना कायम पतीसोबत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये