इतरक्रीडाताज्या बातम्या

बुमराह बाहेर मुंबईला धक्का! ‘हा’ खेळाडू बजावणार का मुंबईच्या किंग मेकरची जागा?

मुंबई | IPL 2023 – आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यास काही तासच शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या मोसमातील पहिला सामना हा गुजरात टायटन्स (GT) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. हा सामना आज (31 मार्च) संध्याकाळी साडेसातला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. अशातच, आयपीएलमधून अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडल्याचं दिसत आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) समावेश आहे. बुमराह मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यामुळे संघाला मोठा बसला आहे. तसंच संघात त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर आता मुंबई इंडियन्सने बुमराहची जागा घेतलेल्या खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे.

जसप्रीत बुमराहची जागा आता संदीप वारियर (Sandeep Warrier) घेणार आहे. संदीप वारियर याआधी आयपीएलमध्ये 2013 ते 2015 दरम्यान राॅयल चॅलेंजर्स बंगळुर संघाचा भाग होता. त्यानंतर तो 2019 ते 2021 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता. त्यानं आत्तापर्यंत 68 टी-20 सामन्यांमध्ये 62 विकेट्स घेतल्या आहेत.

जसप्रीत बुमराह सोबत दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतची (Rishabh Pant) जागाही दुसरा खेळाडू घेणार आहे. या बदली खेळाडूची देखील घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली संघात ऋषभ पंतच्या जागी आता बंगालचा यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलचा (Abhishek Porel) समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये