इतरक्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या माजी नगरसेवकाची भरदिवसा हत्या; सांगली जिल्ह्यात खळबळ

सांगली | Sangli Crime – सांगली (Sangli) जिल्ह्यात भरदिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. जत नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (Vijay Tad) (वय 38) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अल्फोसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारी घडली.

या घटनेनं सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी तालुक्यातून लोकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी कार्यकर्ते नातेवाईक यांचा आक्रोश हृदय पिटाळून लावणारा होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तात्काळ फौजफाट्यासह दाखल झाले होते. वातावरण तणावपूर्ण बनल्यानं पोलिसांची अधिक कुमक मागवली आहे.

विजय ताड यांचा खून कोणत्या कारणातून झाला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शाळेच्या बाजूस त्यांच्या चारचाकी गाडीवर गोळीबार केल्याचं दिसून आलं आहे. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. चारचाकीपासून शंभर फूट अंतरावर ताड हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. बाजूस दगड दिसून आले आहे. त्यामुळे तिथे नेमका गोळीबार झाला की दगडाने ठेचून त्यांचा खून झाला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये