“गुजरातचे सोमेगोमे शिवसेनेला संपवू शकत नाही”; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा ५८ वा वर्धापन दिन सोहळा बुधवार १९ जून २०२४ रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टोलेबाजी केली. “मोदी हा अगोदर एक ‘ब्रँड’ होता, पण आता त्याची ‘ब्रँडी’ झालीय,” अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे देशाच्या राजकारणातील हिरो आहेत. शिवसेनेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतली आहे. महाराष्ट्र फडतूस माणसासमोर झुकणार नाही, हे आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मोदी-शहांना शिवसेना संपवायची होती. पण त्यांनी कितीही अघोरी कृत्य केले तरी शिवसेना संपणार नाही. भाजपाचा पराभव झाला आहे आणि हे आभार यात्रा काढायला निघालेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
हेही वाचा- विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी पार पडणार्या निवडणुकीला स्थगिती द्या; ठाकरे गटाची मागणी
ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला
“उद्धव ठाकरेंनी मोदींचा महाराष्ट्रात पार खुळखुळा केला,” असे म्हणत राऊतांनी राज्यात मिळालेल्या यशावर भाष्य केले. “शिवसेना असंख्य हुतात्मांच्या बलिदानातून स्थापन झाली. त्यामुळे गुजरातचे सोमेगोमे तिला संपवू शकत नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. नकली हिंदुत्ववादी मोदींनी प्रभू रामापेक्षा स्वतःचे फोटो मोठे केले. परंतु, प्रभू रामाने लाथ मारल्यानंतर त्यांना राम दिसले. तसेच राज्यात भाजपाच्या बेईमानीचा स्ट्राईक रेट वाढला,” अशी टीकाही राऊतांनी केली.
हेही वाचा- प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा; विश्व वारकरी सेनेची मागणी
भाजपा १२० वर अडकला
पुढे ते म्हणाले की, “हा भाजपाचा शेवटचा आकडा आहे. यानंतर महाराष्ट्रात आकडा लागणार नाही. हा शेअर बाजार तात्पुरता असतो. दिल्लीत आणि महाराष्ट्रात तो कोसळणार आहे. भाजपानं ११० जागा ५०० ते १००० च्या फरकाने जिंकल्यात. मात्र, तो विजय मानता येणार नाही. जसा अमोल कीर्तिकर यांचा विजय चोरला तसा हा विजय चोरला. भाजपा १२० वर अडकला आहे,” असेही राऊत म्हणाले.
One Comment