“दिल्लीश्वरानी गुंगीचे इंजेक्शन…” फडणवीसांच्या नॅनो मोर्चावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : काल महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi mahamorcha) राज्य सरकारच्या (Shinde fadanvis Government Maharashtra) धोरणांविरोधात आणि आदर्शांचा अपमान (Chhatrapati Shivaji Maharaj) केल्याच्या विरोधात मुंबईमध्ये महामोर्चा Mahavikas Aghadio Mahamorcha Mumbai) आयोजित केला होता. त्यात विरोधी पक्षांतील सर्वच मोठ्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली होती. मात्र, या मोर्चावरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी मोर्चा अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay raut on devendra fadanvis’s nano morcha reaction letest marathi news maharashtra politics)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं की, “जे लोक देवी-देवतांना शिव्या देतात, जे संतांना शिव्या देतात, जे वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, तो कोणत्या वर्षी झाला, हे माहिती नाही, अशा मंडळींचा हा नॅनो मोर्चा होता.” अशा शब्दांत टीका करत महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली उडवली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षावर आपल्या नेहमीच्या शैलीत तोफ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालचा मोर्चा व्यवस्थित पाहिला नसल्याचं म्हटलं आहे. “फडणवीसांनी त्या मोर्चाला नॅनो असे म्हटले होते. त्यावरुन त्यांचे सर्व पदाधिकारी आणि फडणवीस यांनी केलेले विधान म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता नॅनो असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मोर्चा अपयशी ठरल्याचे म्हणणारे शिंदे, फडणवीस हे मधल्या काळात दिल्लीला गेले होते. त्यांना दिल्लीश्वरानी गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसतंय. असे म्हणताना त्यांची गुंगी उतरायला तयार नाही. महाविकास आघाडीचा मोर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसला नाही, त्या आमदारांची बुद्धी देखील नॅनो आहे. खरं तर कालच्या मोर्चाचे स्वागत फडणवीसांनी करायला हवे होते पण तसे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान केला गेला आहे. त्याविरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.” अशी सादेयोड प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.