ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

राऊतांना भिडण्यासाठी शिंदेंची फौज सज्ज, जशास तसं उत्तर देणार

मुंबई : (Sanjay Raut On Eknathi Shinde Group) कथित पत्राचाळ प्रकरणातून जामीनावर बाहेर आल्यानंतर पहिल्या दिवासापासून शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोरांवर तुटून पडले आहेत. शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस बंडखोर आमदार आणि खासदारांना राऊत एकटेच डॅमेज करू शकतात पण शिंदे सेना हा डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, शिंदे ॲन्ड कंपनी राऊतांना जशास तसं उत्तर देण्यासाठी काय आहे नेमका बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्लॅन याबाबत जाणून घेऊयात. खरं तर राऊतांचा जामीन हा शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरलाय. त्यासाठी यापुढं राऊत जे काही बोलतील ते आता शिंदे गटही ऐकून घेणार नाही. राऊतांनाही त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

त्यामुळे राऊतांसाठीही पुढची लढाई सोपी नसणार आहे. एकत्र पक्षात असतानाही राऊत आणि शिंदेचं कधीच जमलं नव्हतं. जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हाही शिंदेच्या निशाण्यावर राऊतच होते. राऊत आणि इतर सहका-यामुळे पक्षावर ही वेळ आल्याचं कित्येकवेळा बोलून दाखवलं. पण आता राऊत आणि एकनाथ शिंदे गट दोघेही मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याने राज्याच्या राजकारणात नवं वाकयुद्ध रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये