“खंजरों को गिना जब, उतनेही थे जितनों को…”, सेनेच्या खासदार फुटीवर राऊतांचं सूचक ट्वीट!

मुंबई : (Sanjay Raut On New Twit) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. या पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागले आहेत.
दरम्यान, मंगळवार दि. 19 रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर ते एका वृत्तवाहिनीशी होते. शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांची देखील हकालपट्टी करणार आहात का? मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्ला देखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
या पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे.
“पीठ से निकले खंजरों को गिना जब, ठीक उततने ही थे, जितनों को गले लगाया था…जय महाराष्ट्र”, असं या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे.