मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच यावेळी संजय राऊतांनी 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं राऊतांनी म्हटलं आहे.
आज (15 नोव्हेंबर) संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचं राऊतांनी सांगितलं. तसंच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिंदे गट आणि विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली. शिवसेनेचं (Shivsena) रक्त स्वस्त नाही. सध्याचं राजकीय वातावरण अस्थिर असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, शिवसैनिकांचं रक्त स्वस्त नाही. शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडवणार असाल तर, शिवसैनिकांचं रक्त स्वस्त नाही हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं, असा इशारा राऊतांनी विरोधकांना दिला आहे.