ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“खंडण्या गोळा करायच्या अन्…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

मुंबई | Sanjay Raut – सध्या मुंबईत होण्याऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनातही हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) हल्लाबोल केला आहे. ते आज (3 डिसेंबर) सकाळी माध्यमांशी बोलत होते.

माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊतांना ‘भाजपनं (BJP) आम्हाला एकही जागा दिली नाही तरी चालेल’, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाल्याचं विचारलं असता राऊतांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. “जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपमध्ये विलीन झाले आहेत. त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. शिवसेनेबरोबर (Shivsena) त्यांना भाजपची युती करायची होती. पण आता ते आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नकोय. मात्र, यापुढेही शिवसेना संघर्ष करत राहील”, असं संजय राऊत म्हणाले.

“त्यांची एक टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते. हे स्वत:ला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना एकही जागा नकोय. जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये