ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

रान पेटलं! संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार? ‘या’ जागेवरून उमेदवारीची शक्यता

मुंबई : (Sanjay Raut will contest the Lok Sabha elections) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची पक्षाची तयारी सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सध्या राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी मुंबईच्या ईशान्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी पक्षाने त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली असल्याचे सांगितलं जात आहे. यावर माध्यमांनी राऊतांना विचारले त्यांनी याला दुजोरा दिला आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला आगामी लोकसभा निवडणूकीत रोखण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. तर विरोधकांच्या ‘इंडिया’ने जोरदार तयारी केली आहे. ईशान्य मुंबईत सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत.

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींमध्ये गणले जातात. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली अन् पक्षाचे अनेक आमदार-खासदार उद्धव ठाकरेंना यांना सोडून यांच्या गटात सामील झाले, त्यावेळीही संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले. संजय राऊतांनी पक्षात उभी फूट फडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बाजू मोठ्या ताकतीने मांडली आहे. .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये