“राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…”, नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut On Narayan Rane – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला आहे. “26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवलं आहे. संजय राऊतला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार”, असा इशारा नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. त्यानंतर आता राऊतही आक्रमक झाले असून त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राणेंना थेट एकेरी भाषेतच प्रत्युत्तर दिलं आहे.
“तो पादरा पावटा आहे. बाळासाहेबांच्या भाषेत, तो पादरा माणूस आहे. मी आत्तापर्यंत त्याच्याविषयी काहीही बोललेलो नाही. हा सगळ्यांना अरे तुरे करतो, हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे करतो, कालपर्यंत एकनाथ शिंदेंना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात त्यानं मोदींनाही अरे तुरे केलंय. कोण आहेत हे, चौकशी करा यांची. आता मी करणार, आता मी काढतो. मी कालपर्यंत संयमानं वागलो. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, आम्ही सगळे, फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांवरती अरे तुरे, अरे तुरे करताय कोण आहात तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. पळून गेलात तुम्ही, तुमच्या किरीट सोमय्यांनी जे तुमच्यावर आरोप केलेत, त्यावर तुम्ही उत्तर दिलं का? किरीट सोमय्या कुठं आहे आता? आता मी तुमच्या 100 बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो”, असा इशारा संजय राऊतांनी नारायण राणेंना दिला.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही कोणत्या अग्रलेखाबद्दल बोलताय? नीट वाचा. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता कालपर्यंत मी गप्प होतो आज तू मर्यादा सोडलीस. तुझ्यासारखे 56 आले आणि गेले. नामर्द माणूस आहेस तू. ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं तू पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगतोस. तुझी लायकी आहे का?” अशी टीकाही राऊतांनी केली.
“हे राऊत विरुद्ध राणे वैगरे काही नाही, त्याला वेड लागलंय. तो वेड्यांच्या कळपात आहे. नारायण राणेची सटकली आहे. तो जरी आमच्यावर टीका करत होता तरीही मी कालपर्यंत त्याचा आदरानं उल्लेख करत होतो. त्याला मी एक शब्द बोललो नाही. पण हा कोण आहे माणूस, डरपोक माणूस याचं मंत्रीपद जातयं. शिंदे गटाच्या माणसांना समावून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे, त्यामुळे तो भैसटला आहे”, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.