संजय राऊतांना दिलासा नाहीच; दसरा मेळाव्यालाही मुकणार!

मुंबई Sanjay Raut’s Judicial Custody Extended : शिवसेनेचे संजय राऊत यांची कथित पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असून, तेथील त्यांचा मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे संजय राऊत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला देखील त्यांना मुकावं लागणार आहे.
सक्तवसुली संचलनालयाने पीएमएलए कायद्यांतर्गत संजय राऊत यांना अटक केलेले आहे. मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. दरम्यान, त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिवसेनेला न्यायालयाने दिली आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळणे ही शिवसेनेसाठी मोठी जीत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या सोहळ्याला संजय राऊत यांना उपस्थित राहता येणार नाही.