ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मातोश्री लोकांच्या दरवाजावर कटोरा घेऊन…”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

छत्रपती संभाजीनगर : (Sanjay Shirsat On Uddhav Thackeray) शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटात सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संजय शिरसाट यांनी ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गट हा गद्दार आहे. हे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. तसेच, संजय राऊत ही राजकारणाला लागलेली कीड आहे, अशा घणाघातही शिरसाट यांनी केला आहे.

“ठाकरे गट हा गद्दार आहे. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली देत मातीत गाडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायचं नव्हते, ते गेले. आम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. हे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ठाकरे गट ‘सिल्व्हर ओक’ला नतमस्तक झाला आहे,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

“‘मातोश्री’वर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार येत होते. ती ‘मातोश्री’ लोकांच्या दरवाजावर कटोर घेऊन जाते, याचं दु:ख आम्हाला होतं. याचा करता-करविता संजय राऊतांसारखे येडे लोक आहेत. राऊत हे राजकारणाला लागलेली कीड आहे. या किडीमुळे उद्धव ठाकरेंचं अध:पतन झालं आहे,” असेही शिरसाट म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये