मुंबई | Sara Ali Khan’s Statement Under Discussion – बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तसंच सारा नेहमी सोशल मीडियावरून तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचबरोबर सारा काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली. सारानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोल्डनेस आणि तिच्या आतापर्यंच्या करिअरवर भाष्य केलं आहे.
सारा अली खानला अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे किंवा बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण यासोबतच तिच्या मंदिरात जाण्यावरही बरेचदा टीका होताना दिसते. सारा अली खान मशिदीत जाते आणि मंदिर आणि गुरुद्वारामध्येही जाते. तसंच सारानं नुकतंच ‘Elle India’ दिलेल्या मुलाखतीत, “मी अशी मुलगी आहे जी मंदिरातही जाते आणि बिकिनी देखील घालते” असं वक्तव्य केलं आहे.
यावेळी सारा म्हणाली, “सारा अली खान सातत्याने विकसित होत आहे. ती शिकत आहे. सारा अशी मुलगी आहे जी मंदिरातही जाते आणि समुद्र किनाऱ्यावर बिकिनी देखील परिधान करते. ती तुमच्यासारखीच आहे जी शूटींगच्यावेळी 45 दिवस आईपासून दूर राहिल्यावर दु:खी होते. आईपासून दूर राहणं तिला आवडत नाही. ती नेहमीच स्वत:ला सरप्राईज देत असते.” तसंच साराची ही मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे.