ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील ड्रग्स प्रकरणाची मोठी अपडेट
पुणे | अमली पदार्थांचा तस्कर ललित पाटील (Lalit Patil Case) ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Sasoon Dean Sanjiv Thakur) यांच्या शिफारशीवरून रुग्णालयात पाहुणचार घेत होता अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यांनंतर ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अनेक वाद निर्माण झाले. आज मात्र उच्च न्यायालयाच्या निकालावरुन त्यांना अधिष्ठातापदावरून हटवण्यात आलं आहे. ललित पाटील प्रकरणामुळे संजीव ठाकूर चर्चेत होते. त्यांच्या जागी आता पुर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची अधिष्ठातापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.