सासवड एस. टी. आगाराने राबवले विद्यार्थिनींचे मोफत पास वितरण अभियान
ग्रामीण भागांतील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय पातळीवर नेहमी वेगवेगळे प्रयोग राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत एस टी बस पास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ दिनांक १८ जूनपासून सुरू झाला असून सासवड एस टी आगाराने या कामी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा आनंदी; खेडमध्ये पेरणीच्या कामांना वेग
सासवड शहरातील वाघीरे विद्यालय, पुरंदर हायस्कूल, कन्या प्रशाला , वाघीरे महाविद्यालय याचबरोबर ग्रामीण भागातील भिवरी, गराडे, बोपगावं इत्यादी ठिकाणीं सासवड आगाराच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून विद्यार्थिनीचे पास वितरण केले तसेच त्यांचें फॉर्म भरून घेतले. गराडे येथील शंकरराव ढोणे विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुमारे चाळीसहून अधिक मुलींना पास देण्यात आले. तालुक्यातून सुमारे दोन हजार पेक्षा अधिक शालेय विद्यार्थिनी या सुविधेचा लाभ घेणार असल्याची माहिती आगार प्रमुख सागर गाडे यांनी दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी आर भिसे, सासवड आगाराचे वाहतूक नियंत्रक व पास वितरण केन्द्र प्रमुख कैलास जगताप स्थानक प्रमुख प्रवीण माळशिकारे, शिक्षकवृंद व विदयार्थी यावेळी उपस्थित होते.”एस टी पास तुमच्या शाळेत” या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन सासवड आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.