‘सर्वांसाठी शिक्षण’ म्हणत ‘सूर्यदत्त’ सरसावले

७५ लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकून घ्यायचे आहेत. त्यांच्यासाठी हे कोर्सेस सूर्यदत्ताने उपलब्ध करून दिले आहेत. अशा अभ्यासक्रमांकरिता या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
पुणे : सर्वांच्या उच्च शिक्षणासाठी आता सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन सरसावले असून फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यांत कार्यरत नोकरदार, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थांत राहणारे व अनाथ विद्यार्थी यांना पदवी व पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलाँग लर्निंग उपक्रमांतर्गत ७५ लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, स्वातंत्र्याची ७५ वर्षे अर्थात आझादी का अमृतमहोत्सव यानिमित्ताने सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट & सीएसआर इनिशिएटिव्ह द्वारे ‘सर्वांसाठी शिक्षण’अंतर्गत ही ७५ लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दहावी, बारावी व पदवीनंतरचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य विद्यापीठांशी संलग्नित अर्धवेळ किंवा डिस्टन्स लर्निंग किंवा अल्प कालमर्यादेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवार-रविवार शिकता येणार आहेत. सोबतच अशा अभ्यासक्रमांकरिता सूर्यदत्तच्या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
नोकरी करीत अर्धवेळ शिक्षण घेणार्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असते. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदा ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात येत आहे. यंदा शिष्यवृत्ती योजनेचे अकरावे वर्ष असून, गेल्या १० वर्षांत १३०० पेक्षा अधिक नोकरदार विद्यार्थ्यांनी साडेतीन कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.
२०० पेक्षा अधिक कंपन्यांना आपल्या संस्थेतील चांगल्या कर्मचार्यांची शिफारस करण्याची विनंती करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उमेदवार पदवीधारक, तसेच २२ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे, असे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.