ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा ईडीची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई | Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल आणि एफएस (IL And FS) प्रकरणी ईडीनं (ED) दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. या समन्समध्ये 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच गेल्या गुरूवारी जयंत पाटलांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी वेढ वाढवून मागितली होती. त्यानंतर आता त्यांना ईडीनं 22 मे रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.

जयंत पाटलांना ईडीनं याअगोदर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, जवळच्या नातेवाईकांचं लग्न समारंभ असल्यानं आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, तसंच चौकशीसाठी वेळ वाढवून द्यावा याबाबतचं पत्र जयंत पाटलांनी ईडीला पाठवलं होतं. त्यानंतर ईडीनं त्यांची विनंती मान्य करत 22 मे रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्यामुळे याच व्यवहारांबद्दल जयंत पाटलांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले जातील. तसंच ईडीनं दिलेल्या या नोटीसवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ईडीनं ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाहीये. जिथं काही देणंघेणंच नाही, तिथं नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये