“मी कधीही आई होऊ शकणार नाही, कारण…”, प्रसिद्ध गायिकेनं व्यक्त केली खंत
मुंबई | Selena Gomez – अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ (Selena Gomez) ही जगभरातील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. तिचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. सेलेना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. आता देखील ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सेलेनानं तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
सध्या सेलेना गोमेझचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिनं तिला असलेल्या एका आजाराबद्दल माहिती दिली आहे. तसंच या आजावर चालू असलेल्या औषधांमुळे ती कधीही आई होऊ शकणार नाही असंही तिनं सांगितलं. तसंच सेलेनानं 2020 मध्ये तिच्या आजाराबद्दल खुलासा केला होता.
दोन वर्षापूर्वी सेलेनानं इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान ती बोयपोलर डिसऑर्डर या आजाराशी सामना करत असल्याची माहिती दिली होती. बोयपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे. त्यावेळी ती म्हणाली होती, “गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या समस्यांचा सामना केल्यानंतर मला लक्षात आलं की मला बायपोलर डिसऑर्डर हा आजार त्रस्त आहे. पण एकदा या आजाराबद्दल सर्व गोष्टी कळल्यानंतर मला याची भीती वाटणं बंद झालं. मला वाटतं की लोक उगाच अशा आजाराला घाबरतात.”
तसंच सेलेना गोमेझनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचे भविष्यातील वैयक्तिक आयुष्याबद्दलचे प्लॅन्स विचारण्यात आले असता ती म्हणाली, “मला निश्चितच मुलांना जन्म द्यायला आवडेल पण मी घेत असलेल्या औषधांमुळे हे माझ्यासाठी कदाचित धोक्याचं ठरू शकतं.” सेलेनाला वाटतं की जेव्हा ती आई बनण्याचा विचार करेल तेव्हा तिला नैसर्गिक पद्धतीनं नाही तर अन्य वैद्यकीय पद्धतींच्या मदतीनं तिच्या बाळाला जन्म द्यावा लागेल.”