मोठी बातमी! संसद घुसखोरी प्रकरणी सात कर्मचारी निलंबित
नवी दिल्ली | संसदेमध्ये (Parliament) बुधवारी चार घुसखोर घुसले होते. त्यानंतर संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गुरुवारी या प्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून सात जणांचे निलंबन (Suspended) करण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2023) बुधवारी खळबळजनक घटना घडली. संसदेचं काम सुरू असतानाच भर लोकसभेत एकानं प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. तर त्याच्यासोबत आणखी दोनजण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तू आढळल्या आहेत. त्यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली होती.
लोकसभेचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होतं. तर अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तसंच प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहत होते. या गर्दीत तीनजण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली खासदार जिथे काम करतात तिथे उडी मारली. त्यावेळी या अज्ञातांकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती.
जेव्हा दोन लोकांनी गॅलरीतून उडी मारली त्यावेळी संसदेत अचानक धूर सुरू झाला. त्यानंतर या दोघांना पकडण्यात आलं. तर या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं होतं. तर आता संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या प्रकरणी लोकसभा सचिवालयाकडून सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे.