ताज्या बातम्या

शाहरुखच्या लेकानं दिली DDLJ ची आयकॉनिक पोज; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई | काल धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत पार पडलेल्या स्नेहसंमेलनाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan), गौरी खान (Gauri Khan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अगस्त्य नंदा (Agastya Nanda), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), करीना कपूर (Kareena Kapoor Khan), शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करण जोहरसह (Karan Johar) अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

यावेळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक अबराम (Abram Khan) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शाहरुख खानप्रमाणे (Shah Rukh Khan) आयकॉनिक पोज देताना दिसत आहे. अबरामने अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंआहे. त्याला आयकॉनिक पोज देताना पाहून किंग खानही भावुक झाला आहे.

अबरामने केली शाहरुखची आयकॉनिक पोज

नाटक संपल्यानंतर अबराम खान वडिलांची नक्कल करताना दिसून आला. छोट्या अबरामला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ‘DDLJ’ सिनेमातील शाहरुख खानची आठवण झाली. शाहरुखसारखी आयकॉनिक पोज देत अबराम म्हणाला,”मला मिठी मारा.. मला मिठी मारायला आवडते”. लेकाचा अभिनय पाहून शाहरुखलादेखील वेड लागलं. अबरामचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अबराममध्ये चाहत्यांना किंग खानची झलक पाहायला मिळत आहे.

अबरामच्या अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेचं स्नेहसंमेलन नुकतच मुंबईत पार पडलं. या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चन, तैमूरसह अनेक स्टार किड्स सहभागी झाले होते. दरम्यान अबराम खानदेखील एका नाटकात सहभागी झालेला दिसून आला. अबरामच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. इंग्रजी भाषेत संवादफेक करत अबरामने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. काहींनी अबरामच्या अभिनयाचं तर काहींनी त्याच्या क्यूटनेसचं कौतुक केलं.

https://www.instagram.com/reel/C04LogUvjgp/?utm_source=ig_web_copy_link

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये