ताज्या बातम्यामनोरंजन

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरबसल्या पाहता येणार ‘पठाण’

मुंबई | किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू सध्या बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटातील डायलॉग्सचं आणि कलाकारांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक देखील केले. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने बॉक्सऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. आज दोन महिन्यांनंतर देखील पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता दोन महिन्यांनंतर प्रेक्षकांना घर बसल्या पठाण सिनेमा पहाता येणार आहे. किंग खान याचा ‘पठाण’ सिनेमा बुधवारी म्हणजे 22 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला पठाण सिनेमा 22 मार्च रोजी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमातून जे सीन डिलीट करण्यात आले होते, ते सीन देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सर बोर्डाने सिनेमातून काही सीन वगळण्यास सांगितले होते. आता पठाण सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्यामु्ळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये