शाहरुखला मिळणार ‘Y+ श्रेणी सुरक्षा’ ! जाणून घ्या यामागचे कारण…
मुंबई | शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ केला. यापूर्वी किंग खानच्या पठाण या चित्रपटानेही असेच काहीसे केले होते. या वर्षी प्रदर्शित झालेले अभिनेत्याचे दोन्ही चित्रपट जबरदस्त ठरले आहेत. शाहरुख खान बाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. ते म्हणजे पठाणनंतर त्याला अनेक धमक्या आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची सुरक्षेची चर्चा होत आहे. मिळालेल्या धमक्यांमुळे शाहरुखला ‘Y+ श्रेणी सुरक्षा’ देण्यात आली आहे.
शाहरुख खान बॉलिवूडचा किंग आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. त्याची फॅन फॉलोईंग आधीही होतीच. आता चाहते त्याला भेटण्यासाठी कोणत्याही घराला जात आहेत. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने त्याला सुरक्षा दिली आहे. शाहरुख खानसोबत 6 पोलिस कमांडो असतील. देशात कुठेही फिरताना त्याला ही सुरक्षा असेल. या सुरक्षारक्षकांजवळ एमपी 5 मशीन गन, एके-47 असॉल्ट राइफल आणि ग्लॉक पिस्तुल असणार आहे. त्याच्या घरीही 4 पोलिस तैनात असणार आहेत.
शाहरुख खान स्वतःच उचलणार खर्च
शाहरुख खान आपल्या सुरक्षेचा खर्च स्वतःच उचलणार आहे. भारतात खाजगी सुरक्षारक्षकांकडे शस्त्र असू शकत नाही. यासाठी पोलिस तैनात असणं आवश्यक आहे. स्पेशल आयजीपी, व्हीआयपी सिक्योरिटी दिलीप सावंत यांच्या अधिसूचनेनुसार, सिनेस्टार शाहरुख खानची वाढती क्रेझ पाहता त्याच्या जीवाला धोका असून शकतो. यासाठी सर्व यूनिट कमांडोला विनंती की ते त्याला एस्कॉर्ट स्केलसोबतच वाय सुरक्षा द्यावी.