महाराष्ट्ररणधुमाळी

फोटो ट्विट करत शालिनी ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर; म्हणाल्या…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी बीकेसी मैदानावर सभा घेतली. यावेळी मुन्नाभाई म्हणत राज ठाकरेंवर टीका केली. तसेच स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी राज आणि बाळासाहेबांचा एक फोटो ट्विट करून उद्धव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कलानगरचे सर्कीट, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान पुढे त्या म्हणाले, कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात, असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो. फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही, असं जोरदार प्रत्युत्तर शालिनी ठाकरेंनी उद्धव यांना दिलं आहे. सोबतच राज यांच्या अर्ध्या चेहऱ्यावर बाळासाहेबांचा फोटो लावत दोघं कसे मिळते-जुळते दिसतात, असं दाखवण्याचा प्रयत्न शालिनी यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये