क्राईमताज्या बातम्यापुणे

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या श्रद्धांजली बॅनरवर धनकवडीत ‘देशभक्त’ असा उल्लेख

पुणे : (Sharad Mohol Death) पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची नुकतीच गँगवॉरमधून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता धनकवडीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ती म्हणजे मोहोळच्या श्रद्धांजलीसाठी लावलेल्या बॅनरवर त्याचा ‘देशभक्त’ असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीही याकडं दुर्लक्ष केल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, याचवेळी स्वाती मोहोळ यांनी देखील आपल्या पतीची हत्या ते हिंदुत्वासाठी काम करत होते म्हणून झाल्याचा दावा केला होता. तसेच पतीच्या हत्येमुळं आपण खचून जाऊन असं कोणी समजू नये कारण मी एका हिंदुत्वाद्याची पत्नी आहे, असं सांगतानाच माझा पती वाघ होता तर मी त्याची वाघीण आहे, असंही स्वाती मोहोळ यांनी म्हटलं होतं.

यानंतर आता शहरातील धनकवडी भागात शरद मोहोळच्या समर्थकांकडून त्याच्या श्रद्धांजलीपर बॅनर झळकवले विशेष म्हणजे त्यावर शरद मोहोळचा उल्लेख देशभक्त म्हणून करण्यात आला आहे. अद्यापही हे बॅनर त्याच ठिकाणी असल्यानं पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये