ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “नव्या संसद भवनाची इमारत बांधताना आम्हाला…”

मुंबई | Sharad Pawar – सध्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून चांगलाच वाद सुरू आहे. संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण नसल्यानं विरोधी पक्षानं मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच या उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्षानं न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार असल्याचं आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. पण हा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. तसंच भूमिपूजन करताना देखील कोणाला विश्वासात घेतलं नाही.”

“संसदेची सुरूवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. तसंच संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं हे सुद्धा मान्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोणालाही विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्यामुळे माझा त्या भूमिकेला पाठिंबा आहे”, असंही शरद पवारांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये