ताज्या बातम्यामहाराष्ट्र
Trending

‘१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…’, अजित पवारांच्या पत्राला शरद पवार गटाचं जोरदार उत्तर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. या दौऱ्यानिमित्त ते जाहीर सभा घेऊन जनतेशी संवादही साधत आहेत. या जाहीर सभांना उत्तर देण्याकरता अजित पवार (Ajit Pawar) गटाकडूनही उत्तरदायी सभा घेण्यात येतेय. यादरम्यान अजित पवार गटाला भाजप सोबत जाऊन 100 दिवस झाले, या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar Letter) यांनी लिहिलेल्या पत्राला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण अशी टीका शरद पवार गटाने केली आहे.

महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मराठी अस्मिता गहाण ठेवली आहे. 100 दिवसांचं कर्तृत्त्व सांगावं लागणं म्हणजे तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येते असेही ते म्हणाले. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले 100 दिवस गहाण ठेवला आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार गटाला 100 दिवस पूर्ण झाले यानिमित्तानं अजित पवारांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले होते. पत्रात अजित पवारांनी स्वत:चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला.तसेच सरकारमध्ये सहभागी होण्यामागची भूमिकाही अजित पवारांनी स्पष्ट केलीय.. यशवंतराव चव्हाणांचा वारंवार उल्लेख करताना शरद पवारांचं नाव घेणं मात्र टाळले. टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे, असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेत, असेही अजित पवार म्हणाले. मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामामार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे, यावर माझा विश्वास आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये