ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
नवी दिल्ली : (Sharad Pawar On Ajit Pawar) शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी उशिरा पोहोचल्याने उशिरा सुनावणीला सुरुवात झाली आहे. जवळपास 50 मिनिटं ते उशिरा दाखल झाले. त्यानंतर सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला.
अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे.
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली आहे. २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.