ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भुजबळ तुरुंगात असताना शरद पवारांनी फडणवीसांना लिहीलेलं पत्र आलं समोर; केली होती ‘ही’ मागणी

मुंबई : (Sharad Pawar On Chhagan Bhujbul) अजित पवार यांच्यासह आठ आमदार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे पक्षात दोन गट पडले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश होता. दरम्यान शरद पवारांना भुजभळ सोडून गेल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

यादरम्यान छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पवारांनी फडणवीसांना विनंती करत लिहीलेलं पत्र आता समोर आलं आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणुक चिन्ह घड्याळ याच्यावर अजित पवार गटाकडून दावा सांगण्यात आला. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी देखील सुरू आहे. यादरम्यन शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर अजित पवार गटाकडून अनेक आक्षेप घेण्यात आले होते. शरद पवार हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात असा दावा करण्यात आला, तसेच ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत, असा आरोप देखील अजित पवार गटाने केला. यानंतर आता भुजबळांसाठी शरद पवारांनी लिहीलेलं हे पत्र समोर आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रातील मुद्दे

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची प्रकृती ढासळत असल्याच्या धक्कादायक बातम्या येत आहेत. वयाच्या 71 व्या वर्षी, 14 मार्च 2016 (2 वर्षे) पासून ते तुरुंगात आहेत आणि त्यांची प्रकृती नाजूक आहे.

आत्तापर्यंत छगन भुजबळ यांच्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींवर माननीय न्यायालयाने निर्णय दिलेला नाही आणि जोपर्यंत न्यायव्यवस्था निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ते निर्दोष असल्याचे मानले जाते. ‘जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे’ असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. हेच तत्व छगन भुजबळ यांनाही लागू आहे. जामीन नाकारला जाणे दुर्दैवी आहे.

छगन भुजबळ हे सार्वजनिक जीवनात 50 वर्षांहून अधिक योगदान असलेले आदरणीय जन ओबीसी नेते आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम केले असून महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही.

छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत याशिवाय मला काहीही अपेक्षित नाही, हा त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. छगन भुजबळ यांची एकंदरीत आरोग्य स्थिती आणि त्यांचे वाढलेले वय याची पूर्ण माहिती असल्याने, मला खात्री आहे की श्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी तातडीने पावले उचलली जातील.

पुढील काळात छगन भुजबळ यांच्यावर काही अप्रिय घटना घडली तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार राहील, हे नोंदवताना मला दुःख होत आहे, असं त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमुद केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये